Share

दिलासादायक बातमी! द. आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडिया फक्त एक दिवस राहणार क्वारंटाईनमध्ये

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना (India Tour of South Africa) होण्यापूर्वी टीम इंडियासाठी दिलासा देणारी बातमी आहे. 16 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावर संघाच्या खेळाडूंना कठीण क्वारंटीनमध्ये राहावे लागणार नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी फक्त एक दिवस आयसोलेशन असेल आणि त्यांची तीन वेळा कोविड-19 चाचणी केली जाणार आहे. चाचणीचे निकाल आल्यानंतर सगळे खेळाडू आणि स्टाफ आयसोलेशनमधून बाहेर पडू शकेलशकणार आहेत. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील क्वारंटाईन टाळण्यासाठी बीसीसीआयने 13 डिसेंबरपासून मुंबईत तीन दिवसांच्या क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. क्वारंटाईन संपल्यानंतर, खेळाडू आणि स्टाफ चार्टर्ड फ्लाइटने जोहान्सबर्गला रवाना होतील, तिथे गेल्यानंतर देखील त्यांची तीन वेळा चाचणी केली जाईल.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, संघ इथे पोहचल्यानंतर लगेच क्वारंटाईनमध्ये जाईल आणि हॉटेलमध्ये आल्यावर त्यांच्या चाचणीच्या निकालानंतर त्यांना अलग ठेवण्यापासून मुक्त केले जाईल. कोविड-19 चाचणीचे निकाल यायला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!