🕒 1 min read
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता एका मागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकताच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. १३ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाची सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हा चित्रपट लवकरच झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात यश मिळाले यामुळे या चित्रपटाची यशोगाथा देखील तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव या गोष्टींचे कथन केले आहे. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/Ce24z9_vX3u/
या चित्रपटासाठी केलेली मेहनत. हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना प्रसाद ओक म्हणाले, ‘मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल’. रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
