मुंबई : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे. दरम्यान यावर शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. घटनेची निंदा करावी तेवढी थोडी आहे. हा खटला फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्यात येईल. शक्ती कायद्याबाबत बैठका झाल्या असून जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे हा अहवाल आहे. अहवाल आगामी अधिवेशनात येईल अशी माहिती त्यांनी दिली. पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना भेटलो आहे. या महिलेला दोन मुली आहेत. पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साकीनाक्यात घडलेला हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. हा प्रकार तर माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आमची मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं. आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. शक्तिrकायद्यासंदर्भात बैठकांवर बैठका चालल्या आहेत. अशा केसेस फास्टट्रॅक कोर्टातही चालवल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाला अशी विनंती करावी, असंही ते म्हणाले. महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यासाठी सरकारला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- साकीनाका घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, सुमोटो दाखल करत पोलिसांना लिहिले पत्र
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- ‘काहीतरी करायचंय म्हणून कार्यालय हलवू नका’, भुजबळांचा मंत्री कराडांना टोला

