Share

‘राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवले, आता गंभीर परिणामांना सामोरे जा’, राजू शेट्टींचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असा विश्वास मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. महाविकास आघाडी सरकारने थापा मारून शेतकऱ्यांना फसवलेले आहे. यांचे गंभीर परिणाम सरकारला लवकरच भोगावे लागतील असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

मी दोन महिन्यापासून सांगत होतो हे सरकार पुरग्रस्तांना फसवतय. गुंठ्याला फक्त १३५ रूपयेच देणार आहेत. त्यावेळेस मुख्यमंत्र्यापासून ते सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री म्हणत होते आम्ही २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत देणार आहोत. पण ही थाप होती. सरकारने ठरवून शेतकऱ्याना फसवलेले आहे. याचा जाहीर निषेध. यांचे गंभीर परिणाम सरकारला लवकरच भोगावे लागतील असे ट्विट राजू शेट्टी यांनी केले आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, संभाजीनगर विभागासाठी 77 कोटी 97 लाख रुपये, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!