मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली आहे. ठाण्यात बस बंद आहेत. नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती, तसंच दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. महाविकास आघाडीतील नेते हे रस्त्यावर उतरून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आणि व्यापारी वर्गाला आवाहन करत आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी लोकांनी आणि व्यापाऱ्यांनी या बंदला विरोध केल्याचे देखील दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने बंद असली तरीही व्यापार सुरूच असल्याचे देखील दिसून आले आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदच्या मुद्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले.आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ चे आवाहन केले होते. त्यानुसार हुतात्मा चौकात राष्ट्रवादीच्यावतीने मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला. सरकार कुणाचंही असो ही जी कृती झाली ती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्रसरकारने जनतेला व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘आशिष मिश्राला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे’; नाना पटोले
- ‘नागरिकांनी घाबरून न जाता कुणी दबाव टाकत असेल तर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा’


