“वहिनी कान्सला जातील आणि भाऊ-दादांना घरी…” ; यशोमती ठाकूर यांची पाटील,फडणवीसांवर खरमरीत टीका
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळाच चांगलेच पडसाद उमटत आहेत. तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी खरमरीत टीका केली आहे.