Share

‘द शो मस्ट गो ऑन’ वडिलांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतरही ‘या’ अभिनेत्याने पुर्ण केला सीन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कलाकाराची नाळ ही अभिनयाशी बाधलेली असते. मनात कितीही विचार असो मात्र जेव्हा अभिनय करण्याची वेळ येते तेव्हा सर्व चिंता दुर सारत अभिनयातुन पात्र जिवंत करताना स्वत:चे दु:ख लपवणे हे कलाकारालाच जमते. अशीच एक घटना स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर घडली.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आप्पांची भूमिका साकारणारे अभिनेते किशोर महाबोले यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. महत्वाची बाब म्हणजे या मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना किशोर महाबोले यांना वडिलांच्या निधनाची वार्ता समजली. मात्र त्यावेळी त्याचा एक सिन चित्रीत करण्याचा बाकी होता. त्यावेळी त्यांनी ‘द शो मस्ट गो ऑन’ या ब्रिदवाक्याला जागत मनातील दु:खाचे वादळ असताना शांत आणि आनंदी असल्याचा आभिनय केला. हा सीन त्यांनी पुर्ण केला आणि ते निघाले.

https://www.instagram.com/p/COebexSJPLU/

राज्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन लागु केल्याने चित्रीकरणास राज्यात बंदी आहे. यामुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे चित्रीकरण हे सिल्व्हासाला सुरु आहे. किशोर महाबोले यांना पितृशोक झाल्याने मालिकेच्या कथानकात थोडासा बदल करण्यात आला आहे. किशोर महाबोले यांच्या पितृशोकाच्या घटनेबद्दल याच मालिकेतील अभिनेते मिलींद गवळीनी इन्स्टाग्राम वर पोस्ट करत माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!