मुंबई : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील स्थिती पाहता आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असून साठेबाजी करून चढ्या दराने हे इंजेक्शन विकण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यात रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या रांगेत उभे राहून अधिक दराने हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने रेमडेसीवीरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील रुग्णांना आता वेळेत व योग्य दरात रेमडेसीवीर इंजेक्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसींसह हे इंजेक्शन देखील निर्यात करण्याऐवजी देशात मुबलक उपलब्ध करून द्यायला हवे अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. केंद्र सरकारने आता निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आव्हाडांनी, ‘म्हणजे आता पर्यंत जो तुटवडा जाणवत होता तो केंद्र शासनाने चुकीचे धोरण अवलंबल्या मूळेच. आधी देशाचे बघा मग परदेशाचे !’ असा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांचे शरद पवारांच्या पावलावर पाऊल,भगीरथ भालकेंसाठी घेतली भरपावसात सभा
- लॉकडाऊन कधी होणार ? टास्क फोर्सनंतर आता मुख्यमंत्र्यांची राज्याच्या मुख्य सचिवांसोबत बैठक
- महाराष्ट्रात कोरोना फोफावतोय; केंद्राने पत्र लिहून राज्य सरकारला फटकारलं
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- …तर सरकारी यंत्रणेवर मोक्का लावावा, निलेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

