Share

दिलासादायक ! केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाटा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासह महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचा विचार करता अधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकडेवारी सादर करून तातडीने मदत करावी अशी मागणी केली होती.

त्यानुसार आता महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. २१ एप्रिल ते ३० एप्रिलच्या पुरवठ्यामध्ये महाराष्ट्राला ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

‘रेमडेसिव्हीर तुटवड्याच्या समस्येविषयी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आज केंद्राने राज्याला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.’ असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!