Share

पुढील आठवड्यात ‘शक्ती’ कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल- दिलीप वळसे पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु झाले आहे. तर २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हटले की, शक्ती कायद्याच्या संदर्भातील जे विधेयक ज्यॉईट समितीकडे पाठवण्यात आलेलं होतं. त्याचं कामकाज पुर्ण झालेलं आहे. त्यामुळे आज विधानसभेत ज्यॉईट कमिटीचा अहवाल आम्ही सादर करणार आहोत. त्यानंतर या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात शक्ती कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल. असे म्हटले आहे.

विधीमंडळात एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावर अनेक प्रश्न विचारण्यात येतील, याबाबतही वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसभागृहात विरोधकांचं आग्रही म्हणणं आणि त्यावर सरकारची भूमिका ही नेहमीच असते. तसेच ही काही नवीन नाही. मात्र, सामंजस्यांनी सर्व प्रश्न मार्गे लावू. असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान या अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यात प्रलंबित ५ विधेयके आणि मंत्रिमंडळ मान्यताप्राप्त २१ अशी एकूण २६ विधेयके आणि अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!