🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दैनंदिन जीवनावरही याचा परिणाम झाला आहे. ज्या प्रकारे आपुलकीने आपण एकमेकांशी संवाद साधत होतो. त्यावरही मर्यादा आल्या आहेत. विस्कळीत झालेल्या नातेसंबंधांचा परिणाम विविध क्षेत्रांवर झालेला आहे. मानवी संबंध तसेच आपले एकमेकांशी जे भावनिक नाते होते तेही विखुरले गेले आहेत. त्यामुळे बापाच्या चरणी आता एकच मागणं मागते लोकांमध्ये एकमेकांबद्दल जी आपुलकीची प्रेमाची भावना होती. ती कायम राहावी. औरंगाबादच्या पत्रकार विद्या गावंडे ‘महाराष्ट्र देशा’च्या गणेशोत्सवात बोलत होत्या.
‘महाराष्ट्र देशा’ने गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते आरतीचा उपक्रम राबवला. यावेळी औरंगाबाद शहरातील पत्रकारिता क्षेत्रातील महिलांना बोलावून त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी बोलतांना विद्या गावंडे म्हणाल्या, पत्रकारांना विशेषतः एखाद्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी निमंत्रित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. त्यासाठी महाराष्ट्र देशाचे मनःपूर्वक धन्यवाद. सध्या गणेशोत्सवामुळे सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्ताने नातलगांच्या भेटीगाठी होतात. दररोजच्या दिनचर्येत गणेशोत्सवामध्ये वेगळेपणा आल्याचे जाणवते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत.
अजूनही कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. कोरोनाने मानवी जीवनावर भयंकर असे परिणाम केलेले आहेत. त्यामुळे मानवी जीवन होरपळून निघाले. अनेकांनी आपल्या जवळच्यांना या काळात गमावले. अनेक जण बेरोजगार झाले. खूप मोठ्या संकटांना मानवाला या काळात तोंड द्यावे लागले. कोरोना च्या पहिल्या लाटेत अनेकांनी गरजूंना मदत केली माणसं एकमेकांच्या मदतीला तात्काळ धावली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती काहीशी बदलली. त्यामुळे आता बाप्पा चरणी एवढेच मागणे मागते, माणसांमध्ये आपुलकीची भावना कायम राहावी. आणि या संकटातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडू दे. एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना.
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांवरील कारवाईवर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…
- ‘राज्यात नाटक-सिनेमे बंद त्यामुळे जनता सोमय्या व पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन पाहतेय’
- कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचनामे करू देऊ नका, आ. राजेश पवार यांचे आवाहन
- सोमय्यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी एक दगड मारला तरी महागात पडेल; चंद्रकांतदादांचा महाविकास आघाडीला इशारा
- विराटच्या ‘त्या’ निर्णयाला सेहवागचा विरोध; म्हणाला, ‘याला काहीच अर्थ नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
