Share

२ ते १८ वयोगटातील बालकांसाठी कोव्हॅक्सिनची चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे भारतातील कोरोनाचा धोका थोडाफार कमी झाला असला तरी अद्याप संपलेला नाही. त्यात संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बालकांसाठी लस कधी येईल, असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत आहे. त्यामध्ये २ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी कोव्हॅक्सिनची चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात असल्याची माहिती पुणे इथल्या राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या संचालक प्रिया अब्राहम यांनी दिली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या इंडीया सायन्स (भारत विज्ञान) या ओटीटी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

उपलब्ध लसींव्यतिरीक्त इतर लसींबाबत माहिती देतांना त्या म्हणाल्या की, ‘पहिल्या डीएनए लसीच्या रुपात झायडस कॅडिलाची लस वापरासाठी उपलब्ध होईल. याशिवाय, गेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडची एम-आरएनए लस, बायोलॉजिकल-ई लस, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची नोवोवॅक्स आणि आणखी-भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने विकसित केलेली इंट्रा-नेझल ही वैशिष्टपूर्ण लस. यासाठी सुई टोचण्याची गरज नाही. ती नाकपुड्यांद्वारे दिली जाऊ शकते.’

जगभरात बूस्टर मात्रेवर अभ्यास केला जात आहे. वेगवेगळ्या किमान सात लसी बूस्टर मात्रा म्हणून वापरल्या गेल्या आहेत. आणखी देशांचे लसीकरण होईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने सध्या हे थांबवले आहे. श्रीमंत आणि गरीब देशातली लस उपलब्धतेची दरी बघता हे पाऊल उचलले आहे. पण, भविष्यात बूस्टर मात्रेची शिफारस नक्कीच येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!