मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने काल या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान आता या बलात्कार प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या डॅशिंग महिला पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम करणार आहेत. ज्योत्स्ना रासम या २७ वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या होत्या. तसेच त्यांनी मर्दानी या चित्रपटासाठी अभिनेत्री राणी मुखर्जीला ट्रेनिंग दिलेले होते. तसेच सध्या त्या राज्य गुप्तचर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
ज्योत्स्ना रासम यांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. यात मुद्रांक घोटाळा, अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरण, 2011 मध्ये हैदराबादहून मुंबईला हिरे आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपींची अटक, दुबईच्या रोशन अन्सारीची अटक अशा प्रकरणांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्या करणार महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; राष्ट्रवादीचा मंत्री शिवसेनेचा नेता रडारवर
- ‘आयपीएल आणि पैशांसाठी सामना रद्द करण्यात आला’; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
- टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, नाहीतर सक्तीची स्वेच्छानिवृत्ती- नितीन गडकरी
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ‘भारतीय असल्यानं प्रत्येक सण साजरे करणार’; अर्शी खानचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

