🕒 1 min read
मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येत आहेत. सोमय्या यांनी घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सुरू आहे. यामुळे संघर्षाची चिन्हे आहेत.
आपला दौरा जाहीर केल्यानंतर काही वेळातच किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिल्याचा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केलाय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान यावर आता भाजपचे नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. ‘किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाकरे सरकार जी कारवाई करत आहेत ती अतिशय अयोग्य आहे. राज्य सरकार ने केलेल्या कारवाईचा निषेध आहे. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांचा कथित घोटाळा उघड करण्यासंदर्भात कागदपत्रे जमवण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते. परंतु तिथे १४४ कलम लावून त्यांना तिथे येवू दिले जात नाहीये. अशा प्रकारची मुस्कटदाबी सरकारने करणे अयोग्य आहे. परंतु कोंबड झाकलं म्हणून उजडायचे राहत नाही. सोमाय्यांवर अशा प्रकारे दबाव आणून सत्य सरकार लपवू शकत नाही.’ असे स्पष्ट मत प्रवीण दरेकर यांनी मांडले आहे.
सन्माननीय @KiritSomaiya जी यांच्या बाबत राज्य सरकार ने केलेल्या कारवाईचा निषेध आहे.
अशाप्रकारे मुस्कटदाबी सरकार करू शकत नाही!#kiritsomaiya pic.twitter.com/mUiLlnEKoO— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 19, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ४० वर्षात १९ मुख्यमंत्री झाले; परंतु संतपीठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच करुन दाखवले- संदिपान भुमरे
- मुंबई ATS अॅक्शन मोडमध्ये; बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या ‘मुन्ना भाई’ला मुंब्रातून अटक
- ओला ई-स्कूटरची दोन दिवसात तब्बल ११०० कोटींची विक्री
- पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर
- इव्हेंट खत्म; एकाच दिवशी अडीच कोटी लोकांच्या लसीकरणावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
