पुणे : सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट म्हणजेच ‘ओमिक्रॉन'(Omicron) विषाणूची लागण झालेले 3 रुग्ण भारतात सापडले आहेत. अन्य काही रुग्णांना ओमिक्रॉन झाला असल्याची शंका आहे. परदेशातून आलेल्या नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा आजार वेगाने पसरत असला तरी घाबरून जाऊ नये असे आवाहन पुण्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे(Avinash Bhondave) यांनी केले आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधत असतांना भोंडवे म्हणाले की,’प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांसाठी ओमिक्रॉनचा धोका अधिक आहे. डेल्टा विषाणूपेक्षा ओमिक्रॉन पाचपट वेगाने अधिक पसरतो. त्याचा पसरण्याचा वेग अधिक असला तरी या आजाराची लक्षणे गंभीर नाहीत.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’ २ ते १८ या वयोगटातील ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे लस घेणे महत्त्वाचे आहे.’
दरम्यान, हात धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि मास्क वापरणे या गोष्टी केल्याच पाहिजे. तरच ओमिक्रॉनला रोखता येणे शक्य आहे. तसेच गर्दीत जाणं टाळले पाहिजे, त्याशिवाय मानसिक आरोग्य चांगलं ठेवणे गरजेचे आहे,असेही भोंडवे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
- ‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा
- ‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला
- …तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का?- अमित शहा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

