Share

…तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का?- अमित शहा

Published On: 

नवी दिल्ली : शनिवारी(४ डिसें.)एका कार्यक्रमामध्ये बोलत असतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी घटनेचा अनुच्छेद ३७० अनेक दशके लागू होता, पण त्या काळात जम्मू- काश्मीरमध्ये शांतता होती का?, असा सवाल विरोधकांना विचारला आहे.

माध्यमांशी संवाद साधतांना जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी अनुच्छेद ३७० पुन्हा बहाल करण्यात येईपर्यंत सरकार या केंद्रशासित प्रदेशात शांतता प्रस्थापित करू शकणार नाही, असे जवक्तव्य केले होते. याच संदर्भात एचटी लीडरशिप समिटमध्ये बोलताना शहा म्हणाले की,’अनुच्छेद ३७० गेली ७५ वर्षे होते. मग तेथे शांतता का नव्हती? शांतता व अनुच्छेद ३७० यांचा संबंध असेल, तर १९९० साली हा अनुच्छेद लागू नव्हता का? जर तेव्हा तो असेल, तर मग त्या वेळी शांतता का नव्हती? आता आपण लक्ष्य करून करण्यात आलेल्या हत्यांचा आकडा जमेला धरला, तरीही आपण १० टक्क्यांच्याही जवळ जात नाही. याचाच अर्थ या ठिकाणी शांतता आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणायला की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० घटनेतून रद्द केले याचा मला आनंद आहे. काश्मीरमध्ये आता शांतता आहे, गुंतवणूक होत आहे, पर्यटक तेथे येत आहेत आणि जम्मू- काश्मीर हळूहळू उर्वरित देशासोबत संघटितपणे उभे राहू पाहत आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!