औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठामध्ये घेण्यात आलेल्या पेट परिेक्षेचा निकाल नुकताच घोषीत केला आहे. शनिवारी विद्यार्थ्यांची यादी येत्या शनिवारी लावण्यात येणार आहे. या वेळी पेट परिक्षा ११ हजार १५४ विद्यार्थ्यांनी दिली तर ६१४ विद्यार्थी गैरहजर होते.
प्रवर्ग तसेच गुण पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी यादी जाहीर होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या सुत्रांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली आहे. ५ हजार ६८८ जणांनी हिंदी, मराठीमध्ये २८४ तर इंग्रजीत ५ हजार १८२ जणांनी परिक्षा दिली आहे. वजा गुणांच्या पद्धतीमुळे यंदा ११६ जणांना शुन्य गुण मिळाले. तब्बल नऊ महिन्यांपासून विद्यापीठामध्ये कोणतीही परिक्षा झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उत्साही होते.
दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर झाले होते. दरम्यान सर्व शैक्षणिक सत्राचे अभ्यासक्रम बंद होते. देशभरासह महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये कोरोनाचे सर्व नियम तसेच शासकीय नियम पाळुन ही परिक्षा घेण्यात आली. या पेट परिक्षा झाल्यामुळे विविध विषयांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता’ ; सरकारने फसवणूक केल्याचा आरोप
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
