🕒 1 min read
मुंबई : शनिवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. यामुळे रविवारी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, पाणी तुंबणे, इमारती पडणे याला महापालिका प्रश्नासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी हल्लाबोल केला होता. विरोधकांच्या टीकेला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर देत महापालिका वगळता पाऊस, नागरिक यांच्यावरच खापर फोडलं आहे.
"मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच, काहीही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्या"…संजय राऊत.
हो खरंच, पालिकेतील टक्केवारीजीवी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळे दुनिया जबाबदार आहे, मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी. pic.twitter.com/BWcvuR5Gbs— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 19, 2021
यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ‘ “मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच, काहीही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्या” असं संजय राऊत म्हणतात. हो खरंच, पालिकेतील टक्केवारीजीवी बेशरम शिवसेनावाले सोडून बाकी सगळी दुनिया जबाबदार आहे, मुंबईकरांच्या जीवितहानीसाठी,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दलित, ओबीसी, शेतकऱ्यांची मुले मंत्री बनले म्हणून काही लोकांना पोटशूळ’; विरोधकांच्या गोंधळावर मोदींच भाष्य
- कुणीतरी येणारं येणारं गं! नेहा धुपिया दुसऱ्यांदा होणार आई
- आयुष्य सार्थकी लागलं; संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या शिवशाही बसचे चालक भावुक
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- ‘मुंबईवरील भविष्यातील संकटाचे हे संकेत तर नाही ना?’; भाजप नेत्याने व्यक्त केली भीती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
