🕒 1 min read
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. आजही जोराचा पाऊस पुन्हा सुरू झाला असून सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री (दि. १७ जुलै) रोजी सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली होती. अवघ्या ८ तासांमध्ये २०० मिलीमीटर पाऊस झाल्याने विविध ठिकाणी दुर्घटना देखील झाल्या.
अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये ३० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, पाणी तुंबणे, इमारती पडणे याला महापालिका प्रश्नासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांनी हल्लाबोल केलाय.
तर, मुंबईची सध्यस्थिती पाहता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी भविष्यातील संकटाबाबत भीती व्यक्त केली आहे. ‘मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही. भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले. गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?’ असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही.
भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले…
गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 19, 2021
यासोबतच, ‘तातडीने महापालिकेसह लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी…या विषयातील तज्ज्ञांना बोलवावे व त्वरीत आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत. मुंबईत यावेळी दिसणारे हे बदल धोकादायक वाटत आहेत. नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ?’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे योग्य उपाययोजनांसाठी विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
- ‘जसा बेस्ट शी.एम तशी बेस्ट महापालिका; सर्वे नंतर सामना म्हणेल आमचीच लाल,’ मनसेचा खोचक टोला
- आयुष्य सार्थकी लागलं; संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या शिवशाही बसचे चालक भावुक
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या विजयी सलामीनंतर शास्त्रींना हटवण्याच्या मागणीला जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
