Share

अक्षयच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या प्रदर्शानाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन लागु करण्यात आला होता. यादरम्यान पुन्हा एकदा अनेक बॉलिवुड चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरु लागल्याने टप्याटप्याने लॉकडाउन शिथील करण्यात येत आहे. यादरम्यान अनेक रखडलेले चित्रपट प्रदर्शीत होण्याच्या मार्गावर आहे.

याच पार्श्वभूमिवर बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याचा आगामी चित्रपट बेल बॉटमच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ जुलै रोजी बेल बॉटम देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल अशी घोषणा त्याने सोशल मीडीयाच्या माध्यामातुन दिली. पहिले हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित होणार होता मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे हा त्याचे प्रदर्शन पुढे ढकलुन २ एप्रिल रोजी प्रदर्शीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्यावर प्रदर्शन पुन्हा लांबले.

https://twitter.com/akshaykumar/status/1404673271883255811

यादरम्यान हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल अशी चर्चा देखील सुरु होती. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे अक्षय कुमारने त्याचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. बेल बॉटम या चित्रपटाचे कथानक १९८० च्या दशकावर आधारित असून, यात अक्षय कुमार रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या कलाकारांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!