Share

#Virar : रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाखाची राज्य सरकारने मदत जाहीर करावी – खरात

Published On: 

मुंबई: नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार इथं एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 17 रुग्ण अडकले होते. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यांची सुटका करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याचदरम्यान ऑक्सिजन गळती आणि शॉर्ट सर्किट मुळे भंडारा, भांडुप, नाशिक आणि विरार येथे काही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयाचे ऑडिट करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

दरम्यान, विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला आहे याची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि तात्काळ या रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाखाची राज्य सरकारने मदत जाहीर करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!