Share

देवदत्त पड्डिक्कलची दमदार खेळी ; केला ‘हा’ विक्रम आपल्या नावे

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.

राजस्थानने दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचे सलामीवीर देवदत्त पड्डिक्कल आणि विराट कोहली यांनी नाबाद १८१ धावांची विजयी सलामी देत १० गडी राखुन विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ४७ चेंडूत ७२ धावांची अर्धशतकी खेळी केली.

पहिल्या तीन सामन्यात संघर्ष करणाऱ्या पदिक्कलने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. यंदाच्या हंगामातील हे दुसरे शतक आहे. या हंगामातील पहिले शतक संजू सॅमसनने झळकावले होते. त्याने केलेली 119 धावांची खेळी आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे.

या शतकासह एक खास विक्रम आपल्या नावे केलाय. आयपीएलमध्ये शतकी खेळी करणारा तो तिसरा भारतीय अनकॅप्ड प्लेअर आहे. 2019 च्या हंगामात मनिष पांड्येने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना डेक्क चार्जस विरुद्ध नाबाद 114 धावांची खेळी केली होती. 2011 मध्ये पॉल वल्थाटी याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 120 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर आता देवदत पदिक्कलने शतकी कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!