Share

बाहुबली प्रभासची करण जोहरवर घणाघाती टीका, केला धक्कादायक खुलासा

Published On: 

मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युनंतर चित्रपट क्षेत्रातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्याचबरोबर या चंदेरी दुनियेत चालणारं राजकारण यावर जोरदार टीका होत आहे. अनेक मोठे सेलिब्रिटी सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. यात सर्वाधिक टीका करण जोहर याच्यावर होत आहे. अनेक जण त्याच्यावर थेट आरोप करत आहेत.

सलून दुकानदारांना पारंपरिक व्यवसाय सोडून आता मोल मजूरी करण्याची वेळ

त्यामुळे करण जोहर आणि त्याने केलेल्या विधानांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. करण जोहरच्या वर्तनावर नेटकऱ्यांनीच नव्हे तर चित्रपट सृष्टीतील अनेकांनी टीका किंवा आरोपसदृश विधानं केली आहेत. यात एक नाव बाहुबली फेम अभिनेता प्रभास याचंही आहे. प्रभास आणि त्याची सहकलाकार अनुष्का शेट्टी यांच्या तथाकथित प्रेमप्रकरणाविषयी करण जोहर यानेच अफवा पसरवल्याचं प्रभासने जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं.

करण जोहरने प्रभासला त्याच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनमध्ये आमंत्रित केलं होतं. त्यावेळी करणने त्याला त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी त्याने प्रभासला त्याच्या आणि अनुष्काचं प्रेम प्रकरण असल्याच्या अफवांविषयीही विचारणा केली. तेव्हा प्रभासने त्याला, त्या अफवा तू पसरवल्या आहेस, असं उत्तर दिलं होतं.

सलाम तुझ्या जिद्दीला : गंवड्याचं पोरगं झालं तहसीलदार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!