अहमदनगर : हाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठाता यांना कारणे दाखवा नोटीस
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.
यामध्ये अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची तहसीलदार पदी वर्णी लागली आहे. सध्या ते सध्या चंद्रपूर नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तुषार शिंदे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडिलांचा बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत तुषार शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे.
शिक्षण करत असताना तुषारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र त्यांनी कधी जिद्द सोडली नाही. त्यामुळे तुषारची जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधुन तहसीलदारपदी निवड झाल्याने शिंदे कुटुंबियांची मान उंचावली असुन त्यांचे सर्वञ कौतुक करण्यात येत आहे.
‘सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासनं देत नाही आणि मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत’
अनेक परिस्थितिला तोंड दिले. अनेक जीवनात चढ उतार आले . पण त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज तो तहसीलदार झाला यांचा आम्हाला व पुर्ण अळकुटीकरानां अभिमान वाटतोय. अशा भावना तुषारचे वडील निवृत्ती नथू शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

