Share

कणकवलीत नितेश राणेंना असणार शिवसेनेचेचं खरे आव्हान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील बंड काही केल्या थंड झाले नाही. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे शिवसेना उमेदवार सतीश सावंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अथवा शिवसेना बंड थंड करेल असे वाटत होते. मात्र भाजपकडून जरी नितेश राणे यांना उमेदवारी दिली गेली असली तरी कणकवलीत शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढाई होणार आहे.

भाजपने अगदी शेवटच्या क्षणी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना भाजपात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपच्या या निर्णयानंतर शिवसेनेने आपला अधिकृत उमेदवार उभा केला. यामुळे महायुती असून देखील नितेश राणे यांना शिवसेनेशीचं लढाव लागणार आहे. त्यामुळे कणकवली मतदारसंघात यंदा नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत अशी हाय व्होलटेज पाहिला मिळणार आहे,

शिवसेना भाजप युती झाली, नारायण राणे बऱ्याच अंशी भाजपात आले, तरी सिंधुदुर्गात शिवसेना आणि राणे या पारंपारीक स्पर्धकातच संघर्ष होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. कधी काळी राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत सर्वाधिक चुरशीची लढत होणार आहे. राणेंसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. कोणीही निवडून आला तरी सरशी मात्र युतीचीच होईल अशी आजची स्थिती आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181513917568208896?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181513099750207488?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181510347666051072?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!