औरंगाबाद : बांधकाम व्यवसायिकाला दीड कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आल्याचे धमकावत त्याच्याकडे ६० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींपैकी एकाला जवाहरनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे/तांबडे यांनी शुक्रवारी दिले.
महेश रवींद्र चौधरी (४६, रा. साईनाथ नगर, आयप्पा मंदीरा जवळ, बीडबायपास) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीखोराचे नाव आहे.बांधकाम व्यवसायिक सुशांत दत्तात्रय गिरी (३५, रा. घर क्र. ६३, शिवशंकर कॉलनी, तानाजी चौक) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार दीड कोटींचा आयकर बुडविल्याची तक्रार आल्याचे धमकावत फिर्यादीकडून ६० लाखांची खंडणी मागणारे फिर्यादीचा मित्र संजय पारख (रा. देवळाई परिसर, बीड बायपास) तोतया आयकर अधिकारी अरविंद जवळगेकर व त्याचा तोतया स्वीय सहायक महेश चौधरी यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी महेश चौधरी याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी आरोपीच्या पसार साथीदारांना अटक करणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का तसेच आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती व्यावसायीकांना खंडणी मागितली याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताचा विक्रम ; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांनी घेतली कोरोना लस
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
- कोरोना इफेक्ट! शिक्षण क्षेत्रावर अवकळा; अकरावी प्रवेशातही गडबड गोंधळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
