औरंगाबाद : यंदा पावसाने उशीरानेच हजेरी लावली होती. ७ जूनला पडलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यात ५ टक्क्यांच्या आत खरीप पेरण्या करण्यात आलेल्या होत्या. मात्र पावसाने तब्बल पंधरा दिवस विश्रांती घेतली व मध्यम हजेरी लावली. या पावसावर शेतकर्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या. त्यानंतर पिकेही तरारून उतरली खरी पण पुन्हापावसाने गुंगारा दिल्याने शेतकरी राजा चिंताक्रांत झाला आहे.
वैजापूर परिसरासह तालुक्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने बी बियाणे रोखीने तसेच तसेच उधारीवर खरेदी करून हजारो हेक्टराची खरीपाची विविध प्रकारची पेरणी व लागवड केली. त्यानंतर जून महिन्यातही समाधानकारक पाऊस झाला यामुळे निंदनी, खुरपणी, मशागत करून खत व फवारणी. तसेच शेतकऱ्यांनी निंदनी, खुरपणी, मशागत करून खत व फवारणी केली. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरातील पिके नावाला राहिल्याच्या मार्गावर आहेत.
सध्या तरी पिके जोमात आहेत. मात्र पाऊस येत नसल्याने पिके ऊन धरत आहेत. तसेच काही पिके करपल्याने शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी घातलेली खते सुध्दा निकामी झाली आहेत. तसेच सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. काही पिकांना फुले, फळे लागली आहेत. अधुन मधुन किरकोळ पावसाच्या सरी येतात. मात्र यामुळे पिकांवर यांचा काही परिणाम होत नाही. कडक ऊन पडत आहे. त्यामुळे सर्वच पिके सुकुन चालली आहेत. लवकरच पिकांची अवस्था दयनीय होईल. यामुळे वैजापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल’
- तब्बल २० वर्षानंतर विंडीजचा फलंदाज झाला नव्वदीत धावबाद
- ‘भाजपने १४ ऑगस्ट साजरा करणे म्हणजे देशाची पुन्हा फाळणी करण्याचा प्रयत्न करणे’-नाना पटोले
- मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात झाली चूक; भाजप आमदार म्हणाला, ‘अभ्यासू आणि ब्येष्ट’
- विनेश फोगाटने WFI ची मागितली माफी, मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

