नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. नुकतेच एसबीआय बँकच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात लोकांना फेक मोबाईल अॅप्स डाऊनलोड करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एसबीआयने ट्विट म्हटले की, ‘आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. येथे काही सेफ्टी टिप्स आहेत, ज्या आपल्याला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा चोरीपासून वाचवू शकतात. आजकाल वाढत्या फसवणुकीचा विचार करता बँकेने आपल्या ग्राहकांना सावधानतेचा सल्ला दिला आहे,’ असं स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
Your Safety is our Priority!
Here’s a quick security tip that could save you from losing personal/financial data!
Download apps only from verified sources. Do not download any app on the advice of unknown persons.
Stay Alert! #StaySafe!#CyberSafety #StayAlert #OnlineScam pic.twitter.com/BPIsefozSb
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 9, 2021
दरम्यान अनेकवेळा फेक अॅप्सच्या माध्यमातून लोकांना सहज जाळ्यात ओढण्यात येत आहे. एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट नोटीफिकेशन जारी करत असते. बनावट अॅप्स व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ईमेल, एसएमएस, कॉल किंवा एम्बेड केलेल्या लिंकपासूनसावध राहण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.
याकरिता कोणतीही संवेदनशील माहिती ऑनलाईन शेअर करू नका, कोणत्याही अज्ञात लिंकवरून कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. यामुळे सायबर गुन्हेगारांकडून तुमची फसवणूक होऊ शकते. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलेल्या सल्ल्याचे ग्राह्कांनी पालन करणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही सेखील ऑनलाईन फसवणुकीचे शिकारी होऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच
- नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

