अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. लॉकडाउनच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. जगाचे अर्थचक्र थांबले असताना शेतकरी मात्र थांबला नाही.
केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असताना राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असून ही बाब निंदनीय आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हा काळा दिवस असल्याची टीका करून राज्यातील सरकारला हा कायदा स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिला आहे. कोपरगाव तहसील कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत शेतकरी विधेयकाला राज्य सरकारने स्थगिती दिल्यामुळे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विवेक कोल्हे बोलत होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आमचा धर्म शेतकरी आहे. आम्हाला संघर्षाचा वारसा आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा कृषिप्रधान आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची परंपरा या तालुक्याने पाहिली आहे. शेतकरी हिताचे सर्वमान्य विधेयक केंद्र सरकारने आणले आहे. यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी सरकारला विधेयक स्वीकारण्यात भाग पाडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, जिल्हा सचिव कैलास खैरे, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजप युवा मोर्चाचे बाळासाहेब पानगव्हाणे, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विजय वाजे, विजय आढाव, शिवाजी वक्ते, बाळासाहेब नरोडे, संजय होन, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजणे, प्रदीपराव नवले, अशोका अवताडे, सुशांत खैरे, खलील कुरेशी यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- सोलापुरात एम आय एम-शिवसेनेला राष्ट्रवादी पाडणार भगदाड ?
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- आमचं सरकार ‘सर्वधर्मसमभाव’ मानणारं परंतु केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – राष्ट्रवादी


