🕒 1 min read
मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय भूकंपाच्या घडामोडी सुरु असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये असलेली धुसफूस, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपशी असलेली गुपित जवळीक, काँग्रेसशी विरोधी विचारधारा असलेली शिवसेना हे सगळे मुद्दे बघता राजकीय हालचाली महत्वाच्या आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते ऐकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल” असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
दानवे यांना आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे तुम्ही आमचं सरकार अमर अकबर अँथनीचे सरकार म्हणताय ते बरोबर आहे कारण या तिन्ही नावात ‘सर्वधर्मसमभाव’ आहे आणि तेच मानणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे मात्र केंद्रातील तुमचं ‘आधळं बहिरं आणि मुकं’ सरकार असल्याचा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.देशात वाढलेली बेरोजगारी आणि उध्वस्त झालेली अर्थव्यवस्था दिसत नाही म्हणून आंधळं सरकार आणि अबला… शोषित… पिडीत… मागास लोकांवर भाजपशासित राज्यामध्ये अन्याय, अत्याचार होतात. या शोषित लोकांचे ओरडणं ऐकू येत नाही म्हणून हे बहिरं आहे. या घटनांवर केंद्रातील मंत्री बोलत नाही म्हणून मुकं सरकार आहे असा हल्लाबोल महेश तपासे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- कोरोनाविषयक जनजागृती मोहिमेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
