मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावं यासाठी रणनीती आखत आहेत.
मराठा संघटनांनी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, मात्र त्यास आपले समर्थन नसल्याचे खासदार संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. तर खासदार उदयनराजेंनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी आपण समाजासोबत असून जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वच आरक्षण रद्द करावी अशी भूमिका घेतल्याने खळबळ उडाली होती.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंच्या याच भूमिकेवरून बोचरी टीका केली आहे. “दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे हे कुठं वाचनात आलं नाही. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं” असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी करत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर घणाघात केला आहे.
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षण ला धक्का लागता कामा नये असे ते म्हणाले. आरक्षणाच्या विषयाला फाटे फोडण्याच काम सुरू आहे. यातून महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडत असल्याचं चित्र आहे. ते बिघडू नये असे आंबेडकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- ८० हजार फेक अकाऊंटवर भाजप प्रवक्ते राम कदम गप्प का?राष्ट्रवादीचा थेट सवाल
- शाहू महाराजांनी आरक्षण दिले, मग आता मराठा समाजाला आरक्षणामधून बाहेर का फेकले जात आहे?
- 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’


