Share

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Published On: 

🕒 1 min read

पुणे : काल रात्री सोमवारी पुण्यात मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटसह सुरु झालेल्या पावसामुळे अनेकभागात पाणी साचल्याचे दिसले. त्यानंतर आता हवामान खात्याकडून राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज मंगळवारी  रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधारांचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर ६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, तर ७ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सध्या पुढील आणखी चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!