🕒 1 min read
सोलापूर : भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या सोलापूर दौऱ्यावर असून सोमय्या यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत पवार कुटुंबीय तसेच पोलिसांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी त्यांनी दिवसेंदिवस उघड होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात पोलिसांवर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलतांना सोमय्या म्हणाले की, ‘अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये. माझ्याकडे पुरावे आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?’ असा सवालही त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले की,’बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे. आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही. मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का? ते शरद पवार यांना मान्य आहे का?. तसेच ‘माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत. यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावे,’ असे खुले आवाहनही सुमय्या यांनी केले.
दरम्यान, ‘हे घोटाळे पोलिसांनी उघड करायला हवे, मात्र हे पोलिसांचा उपयोग माफिया म्हणून काम करत आहेत. पोलीसच चोरी करतेय, पोलीसच सुपारी घेतेय, पोलीस आयुक्तच गायब होतो, गृहमंत्री फरार होतो. म्हणून शेवटी जनतेने जायचं कुठं? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकायुक्त, राष्ट्रीय हरित लवाद, मानवाधिकार आयोग यांच्याकडे किरीट सोमय्या जात आहे तर त्यात चूक काय?’ असे यावेळी त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
