Share

‘पोखरा’ योजनेत शेतीसाठीच्या यंत्रांचा समावेश करावा, भाजयुमोची मागणी

Published On: 

🕒 1 min read

लातूर : मराठवाडा आणि विर्दभातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जिवणात आर्थिक क्रांत्री आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकाराने नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना (पोखरा) चालु केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या योजनेत बदल करुन शेतीसाठी गरजेचे असलेले यांत्रिकीकरण यंत्रे वगळली आहेत. त्यांचा समावेश पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या संबधीचे निवेदन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना देण्यात आले.

यामध्ये भाजप युवा मोर्चोन म्हटले की, ‘ब्राझीलमध्ये १५ टक्के लोक शेती करतात आणि ७५ टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. परंतु भारतात अजूनही ५५ टक्के लोक शेतीवर अवलंबून असतांना फक्त ४० टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या जास्त दिसत असली, तरी मगील दशकापासून शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या घटली आहे. ग्रामीण रोजगार हमी योजनेमुळे तसेच रोजगाराच्या शोधात शहरी स्थलांतरामुळे प्रत्यक्ष शेतीतकाम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही, तसेच या शेतीसाठी आता यांत्रिकीकरण हाच पर्याय आहे.

त्यामुळेच या योजनेत स्वंयचलित रिपर यंत्र, मळणीयंत्र, रोटावेटर, विद्युत पंप, सुक्ष्म सिंचन यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजयुमो देवणीच्या वतीने आमदार संभाजी पाटील निंलगेकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे ,जि.प.सदस्य प्रंशात पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे, बाळासाहेब बिरादार, सुंशात पाटील, रामकृष्ण बिरादार, संगाप्पा चरपले आदींच्या स्वाक्षरी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!