Share

‘दिल और तिल.’म्हणत भूमीने शेअर केलेल्या फोटोने वेधले लक्ष

Published On: 

मुंबई : ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून सर्वपरिचित झालेली अभिनेत्री भूमी पेडणेकरने याच चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. भारदस्त अभिनयाने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान बनवले आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तसेच, आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

नुकतेच अभिनेत्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक अवतारात दिसत आहे. भूमीने दिवाळी सणानिमित्त भूमीने गुलाबी रंगाचा लेहंगा- चोली घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंद्वारे तिने सिक्रेट तीळही दाखवले आहे. तसेच सुंदर दिसण्यासाठी भूमीने न्यूड मेकअपसह केसांची पोनी बनवली आहे. दागिन्यांच्या नावावर अभिनेत्रीने फक्त हार घातला आहे. भूमीने एका फोटोमध्ये तिच्या पाठीवरील तीळही फ्लॉन्ट केला आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दिल और तिल.” अभिनेत्रीने एकत्र अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या आकर्षक पोझ देताना दिसत आहे. लाखो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

https://www.instagram.com/p/CV4glHXoELK/?utm_medium=copy_link

अभिनयासोबतच भूमी पेडणेकर तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, ती चाहत्यांशी संवाद साधत असते. भूमीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास ‘बधाई हो’ आणि ‘रक्षाबंधन’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमाने झळकणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!