औरंंगाबाद : फायनान्सचे हप्ते चुकविण्यासाठी दुचाकीला बनावट नंबर प्लेट लावणाऱ्या खान अहेमद खान आरीफ (वय २४, रा. भडकलगेट) याला नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी गजाआड केले होते. दुचाकीवर बनावट नंबर टाकुन फिरणाऱ्या खान अहेमद खान आरीफ याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी दिले आहेत.
वाहतुक शाखेच्या पोलिस अंमलदार सुनिता नारायण वाल्डे यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, २८ एप्रिल रोजी आरेफ कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टी.बी रुग्णालयासमोर वाल्डे या सहकार्यांसह नाकाबंदीच्या कर्तव्यावर असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास टाऊनहॉल उड्डाणपुलावरुन दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईबी-४६७४) वर आलेल्या खान अहेमद याला थांबवले. त्याच्याकडे दुचाकी बाबत चौकशी केली असता, त्याने दुचाकी स्वत: ची असल्याची सांगितले.
मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ई चालन मशीनवर दुचाकीचा क्रमांक तपासला असता, सदर दुचाकी क्रमांक हा सुधीर साकोळकर (रा. विजयलक्ष्मी कॉलनी, मिलकॉर्नर) यांच्या नावे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी खान अहेमद कडे चौकशी केली असता, फायनान्सचे हप्ते चुकविण्यासाठी दुचाकीला बनवाट नंबर प्लेट लावल्याची कबुली दिली. प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन खान अहेमदला अटक करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

