🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : देशात ५ व्या टप्प्यातील मतदान संपले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उरलेल्या २ टप्प्यांकडे लक्ष केंद्रित केलं आहे. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
बिष्णुपूर येथील सभेत त्यांनी मी मोदींनी देशाचा पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी बैठकीत सहभागी झाली नाही. मी त्यांच्यासोबत एका मंचावर उपस्थित राहू इच्छित नाही. वादळामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही असं विधान केल आहे.
Mamata Banerjee in Bishnupur: If I am a toll collector then what are you? From head to toe you are filled with people’s blood. When asked what does his (PM) wife do & where does she stay, he (PM) said he doesn't know. He can't take care of his wife, he will take care of Indians? https://t.co/VoikojGG32
— ANI (@ANI) May 6, 2019
पुढे बोलताना त्यांनी ‘जर मी टोल कलेक्टर आहे तर तुम्ही कोण आहे? तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुमची पत्नी काय करते? ती कुठे राहते? तर त्यावर पंतप्रधानांकडे उत्तर नाही. जो स्वत:च्या पत्नीचा संभाळ करु शकत नाही तो भारतीयांचा संभाळ कसा करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे


