Share

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर पक्षच भूमिका घेईल; भाजपच्या दिग्गज नेत्याने प्रतिक्रिया देणे टाळले

Published On: 

मुंबई : जातिनिहाय जनगणनेबाबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याचा विधानामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१ ची जनगणना जातिनिहाय व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मुद्द्यांनाही हात घालायला सुरुवात केली आहे. पंकजा यांनी आता थेट ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या काही वचनांची आठवण करून दिली आहे.

आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं आहे. पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे.

यावर, भाजप नेते व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना प्रश्न केला असता, ‘पंकजा मुंडे या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर पक्षच आपली भूमिका स्पष्ट करेल’, असं सांगत अधिक प्रतिक्रिया देणं टाळलं. तर, पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटसोबत लोकसभेतील गोपीनाथ मुंडे यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

त्यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर भाजपची सत्ता आली पण अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. आज खुद्द पंकजा मुंडेंनी हिंदीत ट्विट करत थेट दिल्लीला ओबीसींच्या जनगननेची आठवून करून दिली आहे. यामुळे आता भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या मागणीही सहमत आहेत का ? केंद्रीय स्तरावर ओबीसी जनगणनेसाठी काही हालचाली होतील का ? याकडं सर्वच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!