Share

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये हाहाकार;काही शहरात प्रवासबंदी लागू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु,तर ८३० जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. २९ प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या विभागात १ हजार ७२ नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

२५ पैकी २४ मृत्यू चीनच्या हुबेई प्रांतात झाले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चीनच्या ५ शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात आली आहे. थायलंडमध्ये तीन जणांना या विषाणूंची बढाझाली होती, पैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. कोरिया, अमेरिका आणि सिंगापूर इथं प्रत्येकी एका रुग्णाला विषाणू बाधा झाली आहे, तर व्हिएतनाम इथं दोन रुग्ण आढळले आहेत.

चीनमध्ये ९ हजार ५०७ रुग्णांपैकी ८ हजार ४२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर हजार ८७ रुग्णांना उपचारा नंतर घरी पाठवलं आहे. दरम्यान, या समस्येला इतक्या लवकर आरोग्य आणीबाणी जाहीर करणं अगतिकता होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

आकाशवाणीने दिलेल्या वृत्तानुसार,सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिकादेखील कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी करण्यात आली. या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळं ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली.दरम्यान, यासंदर्भात दूतावासानं ट्विटर संदेशात दिलेल्या माहितीनुसार, तिला एम.ई.आर.एस.- सीओव्ही प्रकारच्या विषाणूची बाधा झाली असून, तो चीनमधल्या वुहान इथं पसरणारा कोरोनाचा प्रकार नाही.

या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळं ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली.दरम्यान, यासंदर्भात दूतावासानं ट्विटर संदेशात दिलेल्या माहितीनुसार, तिला एम.ई.आर.एस.- सीओव्ही प्रकारच्या विषाणूची बाधा झाली असून, तो चीनमधल्या वुहान इथं पसरणारा कोरोनाचा प्रकार नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!