Share

सलामीवीरांची नाबाद खेळी, पहिल्या दिवसअखेर इंग्लंडकडे ४२ धावांची आघाडी

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारत कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला तर इंग्लंडने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले.

पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 78 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल दिवसभराचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद 120 धावा केल्या होत्या. रोरी बर्न्स आणि हसीब हमीद अर्धशतकांसह खेळत आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर इंग्लंडने भारतावर 42 धावांची आघाडी घेतली होती.

इंग्लंडचा डाव, बर्न्स आणि हसीबचे अर्धशतक

रोरी बर्न्स आणि हसीब हमीद भारताविरुद्ध डावाची सलामी देण्यासाठी उतरले. दोघांनीही संयमी सुरुवात केली आणि संघासाठी अर्धशतकी भागीदारी खेळली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजांना विकेट घेण्याची एकही संधी दिली नाही. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. हसीबने 110 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले, तर बर्न्सने आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 5 चौकार आणि 1 षटकारासह 123 चेंडू खेळले.

भारतीय संघाची फ्लॉप फलंदाजी

नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात संघाला धक्का बसला. जेम्स अँडरसनने मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या केएल राहुलला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तेव्हा भारताचा स्कोअर फक्त 1 रन होता. यानंतर पाठोपाठ अँडरसनने चेतेश्वर पुजाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला फक्त 1 धाव घेता आली. यानंतर अँडरसनने विराटला फक्त 7 धावांवर बद केलं. लंच टाइम पर्यंत अजिंक्य रहाणेही 18 धावा करून बाद झाला.

ओली रॉबिन्सनने त्याला बाद केले. लंच टाइम नंतर त्याने रिषभ पंतला 2 धावांवर केले. यानंतर क्रेग ओव्हरटनने रोहित शर्माला 19 धावांवर बाद केले. त्यानंतर ओव्हरटनने मोहम्मद शमीला शून्यावर बाद केले. सॅम कुरनने रवींद्र जडेजाला 4 धावांवर बाद करून आठवा धक्का दिला. त्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहला बाद केले. ओव्हरटनने सिराजला 3 धावांवर बाद केले. इशांत शर्मा 8 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने 3-3 तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम कुरन यांनी 2-2 बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!