🕒 1 min read
मुंबई : आज एटीएस प्रमुख जयजित सिंह यांनी पत्रकार परिषदेत मनसुख हिरण हत्या प्रकरणाची माहिती दिली आहे. तसेच सचिन वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका करु असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर घटनास्थळी कोणताही पुरावा सापडला नव्हता, पण गुन्ह्यात वापरलेल्या सिम कार्ड्सचा आम्ही शोध लावला होता, काही सिम कार्ड्स आरोपींनी नष्ट केले होते. तसेच याप्रकरणी आता आणखी काही आरोपींना आणि संशयितांना अटक होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.
एटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी या पत्रकार परिषदेत सुरुवातीपासूनचा घटनाक्रम सांगितला. “दिनांक ६ मार्च रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग केला. ७ मार्च रोजी याबाबतची कागदपत्रं आम्ही ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच दिवशी आम्ही विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला.
सचिन वाझे यांचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका करणार असून सचिन वाझे हे मनसुख हिरण हत्येतील संशयित आरोपी आहेत. त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासात उघड झाला आहे, अशी माहिती एटीएस प्रमुख जयजेत सिंह यांनी दिली आहे.
याच पार्श्वभुमीवर आता भाजपने महाविकास आघडीवर विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषेद घेतली होती. व यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची काहीशी पाठराखण केली होती. ‘सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का?’ असे देखील वक्तव्य त्यांनी केले होते.
आता या प्रकरणात वाझेच दोषी असल्याचेच स्पष्ट होताच भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. ‘एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? विधी मंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली केलीत तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा…’
एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? विधी मंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली केलीत तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 23, 2021
अशा आशयाचे ट्वीट त्यांनी आज केलेले आहे. या प्रकरणाला लागलेल्या या नव्या वळणामुळे आता आगामी काळात पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होताना दिसतील असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- डिजिटल माध्यम क्षेत्रात ‘महाराष्ट्र देशा’ची गरुडझेप…
- मोठी बातमी! जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी उडवली, तीन जवान शहीद
- …अन् विश्वविक्रमी खेळीनंतर पांड्या बंधूंसाठी भावुक क्षण; कृणालला आनंदाश्रू झाले अनावर
- अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत ?
- परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार; देशमुखांच्या अडचणी वाढणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

