Share

‘त्या’ चौकशी समितीवरील आक्षेप हा भाजप आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बचे राज्याच्या राजकारणात देखील मोठे पडसाद उमटत आहेत. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशीसाठी महाविकास आघाडी सरकारने समितीची घोषणा केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या स्थापनेवर भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील समितीच्या अधिकारांवर व दर्जावर आक्षेप घेतला आहे.

भाजप नेत्यांनी समितीवर आक्षेप घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश यांची चौकशी लावली आहे, चौकशी नंतर सत्य बाहेर येईल. सत्य बाहेर येण्याआधीच राष्ट्रपती राजपूत लागू करण्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. भाजपचे केवळ त्यांचे आमदार वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,’ अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!