Share

शिवसेनेत बाहेरच्यांची संख्या जास्त झाली, संज्या मोजून बघ; निलेश राणेंची शिवसेनेवर जहरी टीका

Published On: 

मुंबई : भाजपच्या माहिम कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या कार्यक्रमाला नितेश राणेही उपस्थित होते. यावेळी लाड म्हणाले की, नितेशजी, पुढील कार्यक्रमला कायकर्ते थोडे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलिस जास्त येतात. फक्त पोलिसांना गणवेश घालून पाठवू नका, असे सांगायला पाहिजेच. कारण त्यांना तुमची आमची इतकी भीती आहे की, आपण माहीममध्ये जरी आलो तरी त्यांना वाटतं की हे शिवसेना भवन फोडणारच… काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू. या वक्तव्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. शिवसेनेने देखील या वक्तव्यावर प्रत्युतर दिले.

‘महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?’ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे म्हणाले, यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोस्ट करत ते म्हणाले, ‘शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संज्या मोजून बघ. मोबाईलची बटन दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संज्या काय सांगतो.’ असे ते म्हणले.

दरम्यान, लाड यांच्या विधानानंतर भाजप शिवसेना शीत युद्ध पहायला मिळत आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते शिवसेनेवर टीका करतांना दिसत आहे. दुसरीकडे शिवसेना देखील भाजपवर निशाणा साधता आहे. सोशल मीडिया या युद्धाचे एक केंद्र बनले आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!