सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमाचे पालन करावे, कोरोनाला सर्वांच्या साथीने हरवूया, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.
भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या कमी होत आहे, म्हणून कोणीही गाफील राहू नये. जिल्ह्यातील पाच तालुक्यात कडक संचारबंदी आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रूग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. होम आयसोलेशन कमी केल्यानेही रूग्णसंख्या आटोक्यात राहिली आहे. पॉजिटिव्ह दर 2 टक्के झाला आहे. सोलापूर शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यात कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा दोन नंबरवर आला आहे. प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेने लस मिळाली की ती नागरिकांना दिली. यामुळे जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे. दोनवेळा 80 हजार लस मिळाली आहे, अशीच लस मिळाली तर दीड महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, असा आशावाद भरणे यांनी व्यक्त केला.
कोरोनाचा पहिला डोस 29 टक्के तर दुसरा डोस 11.03 टक्के नागरिकांना दिला आहे. 40 टक्के नागरिकांना डोस दिल्याची माहिती लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी दिली. अपंगांच्या दाखल्यासाठी शिबीर घ्याजिल्ह्यातील अपंग व्यक्तीला लाभासाठी दाखल्यांची गरज आहे. सिव्हील हॉस्पिटलने शिबीर घेऊन दाखले मिळवून देण्याची सूचनाही भरणे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोमूत्र अँटीबायोटिक, त्यामुळे संसर्गजन्य आजार बरे होतात’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा यांचा दावा
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


