Share

‘गोमूत्र अँटीबायोटिक, त्यामुळे संसर्गजन्य आजार बरे होतात’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ : भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. साध्वी यांनी पुन्हा एकदा एक अजब विधान केले आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असून त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार बरे होत असल्याचा दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व प्रकारचे संसर्गजन्य रोग बरे होतात.’ अशा प्रकारचा दावा केल्यानंतर सोशल मीडियात साध्वी प्रज्ञा यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होतोय.

भाजप खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान देखील अनेकदा अशाप्रकारची वादग्रस्त विधानं केली आहेत. ‘गोमूत्र प्यायल्यानं फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. त्यामुळे मला अद्याप कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही.’ असा दावाही त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

तसेच साध्वी प्रज्ञा यांनी ऐन कोरोना प्रादुर्भावच्या काळात कोरोना मुक्त होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला होता. कोरोना विषाणूची साथ समूळ नष्ट करण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सर्वजण एक आध्यात्मिक प्रयत्न करूयात, त्यासाठी २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करण्याचा सल्ला देखील साध्वी प्रज्ञा यांनी दिला होता. तेव्हाही वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणाऱ्या अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!