Share

इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील

Published On: 

 बुलढाणा – संपूर्ण देशात इंधनाचे दर वाढलेले असून केंद्र सरकारने कमी केले पाहिजेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकार वर केली आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. इंधन दर कमी करण्याची किल्ली ही अजित पवारांकडेच आहे असं पाटील यांनी म्हटले आहे.

पाटील म्हणाले, केंद्राने यापूर्वी अनेकवेळा इंधन दर कमी केले असून राज्याला मिळणारे 35 पैशातून 10 पैसे कमी करावेत म्हणजे इंधन दर कमी होईल. गोवा राज्यात दर कमी केलेत, कर्नाटकने केलेत, गुजरातने कमी केलेत तसे तुम्हीही करा असा असा सल्ला त्यांनी दिला आहे. सोबतच आता अजित पवार मोदींना शिकवणार का ? असा प्रतिप्रश्न देखील पाटील यांनी अजित पवारांना केलाय.

दरम्यान, दिल्ली मध्ये 9 महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुय , त्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित करून आंदोलन सोडवावे, मात्र त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता, यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी ही उत्तर दिले असून झोपेलेले शेतकऱ्यांना उठवू शकतो मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कसं उठवणार ? असा प्रश्न विचारला, आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांना कायदा मान्य आहे असं देखील पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!