🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता.
आता कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात दाखल खटल्याची सुनावणी काल पुन्हा लांबणीवर पडली. आता ही सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार आहे. काल दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद तयार नव्हते.
इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानाचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.
काल हे कामकाज होणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले होते. मात्र दोन्ही बांजूच्या वकिलांची यासाठी तयारी नव्हती. त्यामुळे काल कामकाज होऊ शकले नाही. मधल्या काळात न्यायालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर होणार आहे. त्यानंतर दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे सुनावणी आता थेट २५ नोव्हेंबरला होणार आहे, अशी माहिती ॲड.रंजना गवांदे पगार यांनी दिली आहे.
काल कोर्टाचे कामकाज झाले नसले तरी कोर्टाबाहेर काही घडामोडी पहायला मिळाल्या. या प्रकरणातील सरकारी वकिलांच्या भावाविरुद्ध संगमनेरच्याच न्यायालयात एक खटला सुरू आहे. इंदुरीकरांची बाजू मांडणारे वकीलच सरकारी वकिलाच्या भावाचाही खटला चालवित असल्याचे उघड झाले.
न्यायिक तत्वानुसार असे चालत नाही. ही माहिती बाहेर कशी आली, प्रसारमाध्यमांपर्यंत कशी गेली, याबद्दल संबंधित वकील एकमेकांकडे संशयाने पहात होते. आता यासंबंधी वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतो. स्थानिक पातळीवर वकील काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता; जान कुमार सानूचा माफीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
