मुंबई: १ जानेवरी २०२१ मध्ये चेक पेमेंट सिस्टम मोठा बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी याबद्दल ६ ऑगस्ट ला मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे एमपीसी बैठकी मध्ये हि घोषणा केली होती. पॉजिटिव पेमेंट सिस्टम या नव्या नियमानुसार ५०,००० च्या पेक्षा जास्तीच्या व्यवहाराला पुन्हा एकदा कन्फर्म करण्याची गरज असणार आहे.
ही एक आर्थिक गैरव्यवहारांना रोखणारी प्रणाली आहे. यानुसार ५०,००० च्या पेक्षा जास्त रकमेचा चेक असेल तर त्यासाठी ग्राहकाला बँकेला पूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. SMS, इंटरनेट बैंकिंग, एटीएम किंवा मोबाइल बैंकिंग च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली चेक ची तारीख, बेनिफिशियरी च नाव अकाउंट नंबर, एकूण रक्कम आणि इतर माहिती संबंधित ग्राहकाला द्यावी लागणार आहे.
या नंतर चेक वटण्या अगोदर हि माहिती पडताळून पहिली जाईल. जर चेक ची सर्व माहिती पुन्हा दिलेल्या माहितीशी जुळणारी असेल तरच हा चेक वटला जणार आहे. अन्यथा हा चेक वटण्यापासून थांबवला जाईल.
जर चेक मध्ये एका बँकेचा चेक दुसर्या बँकेत दिला गेला असेल , दोन बँकांचा व्यवहार असेल तर दोन्ही बँकांना ही माहिती दिली जाणार आहे. तर देशातील ८०% चेक याच प्रणाली नुसार वटवले जाणार आहेत.
नेशनल पेमेंट कॉरपोरेशन आफ इंडिया (NPCI) चेक ट्रंकेशन सिस्टम (CTS) मध्ये पॉजिटिव पे सुविधा विकसित करणार आहे. चेक ट्रंकेशन सिस्;टम (CTS) चेक ला क्;लीयर करण्याची एक प्रक्रिया आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिकली हि प्रणाली काम करते.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- धक्कादायक : भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

