Share

औरंगाबादहून एप्रिलमध्ये धावणार ‘या’ नव्या रेल्वे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : रेल्वे बोर्डाने घोषित केल्यानुसार नांदेड येथून विविध भागात जाण्याकरीता एप्रिल महिन्यात सहा नवीन विशेष रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  नांदेड ते निझामुद्दीन ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दर मंगळवारी ६ एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी ९ वाजता सुटेल.

ही रेल्वे औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रा मार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.  निझामुद्दीन ते नांदेड ही साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी हि गाडी  ७ एप्रिल पासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री आग्रा, झांसी, भोपाल, मनमाड, औरंगाबाद मार्गे नांदेड येथे पोहोचतील.

आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्स्प्रेस हि गाडी १ एप्रिल पासून आदिलाबाद येथून किनवट येथे पोहोचेल.  नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस नांदेड येथून सुटेल आणि भोकर, हिमायतनगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे पोहोचेल.  नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी दि. २ एप्रिलपासून नांदेड येथून सुटेल आणि परभणी मार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी पोहोचेल.

औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी दि. ५ एप्रिल पासून नांदेड येथून सुटेल आणि परभणी मार्गे नांदेड येथे सकाळी पोहोचेल.  औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शुक्रवारी दि.२ एप्रिलपासून औरंगाबाद येथून सुटेल आणि परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकळ मार्गे रेनीगुंटा येथे सायंकाळी पोहोचेल.

रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर शनिवारी ३ एप्रिल पासून रेनीगुंटा येथून सुटेल आणि गुंटकळ, रेचुर, विकाराबाद, परभणी मार्गे औरंगाबाद येथे रात्री पोहोचेल.  नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर सोमवारी दि. ५ एप्रिलपासून नांदेड येथून सुटेल आणि किनवट, नागपूर, रायपुर, बिलासपुर, चक्रधरपूर, खरगपूर मार्गे सत्रागच्ची (कोलकत्ता) येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. सत्रागच्ची ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी ७ एप्रिल पासून सत्रागच्ची (कोलकत्ता) येथून सुटेल आणि खरगपूर, चक्रधरपूर, बिलासपुर, रायपुर, नागपूर, किनवट मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पोहोचेल.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!