🕒 1 min read
मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेतीसंबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्याबळाच्या आधारावर मंजूर करून घेतले. या नवीन कायद्यामुळे भारतीय शेतकरी देशोधडीला लागणार आहे, असं मत व्यक्त करत दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा असल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 ते 4 या वेळेत धरणे धरणार आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- “अन्नदात्यासह आता अन्नपूर्णेवरही वार, देशाला आणखी किती लाचार करणार आहात?”
- ‘राज्याच्या ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट’
- ‘गुलाबी’ चक्रव्युव भेदण्यास विराट सेना सज्ज, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
- ‘भाजपा हा महाराष्ट्राच्या विकासाच्या झारीतील कमळाचार्य’
- उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
